अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश संकेतस्थळावर निश्चित करावा

गडचिरोली :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 13 मुलांचे व 8 मुलींचे असे एकुण 21 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता 2115असुन त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता  www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता 11 वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत अठरा वसतीगृहात इयत्ता 8 वी पासुन पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी.वसतीगृहातील जुने प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज रिन्यू हे ऑप्शन निवडुन भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचेजागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्ड कॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावी. वसतीगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता दिनांक 31 जुलै 2024 पर्यत व व्यावसायीक अभ्यासक्रमा करीता 31 ऑगष्ट 2024 पर्यंत सुरू राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. तसेच प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दिनांक 25 ऑगष्ट 2024 पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावे, असे सहायक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पावसाळापुर्वी नदी,नाले व विहीरी खोलवर स्वच्छ करून नागरिकांचे जिवन सुरक्षित करावे

Fri Jun 14 , 2024
नागपूर :- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात पावसाळ्यापुर्वी नागपूर शहरातील नदी आणि नाले व विहीरींची साफ सफाईची कामे युद्धपातळीवर करण्यात यावे आणि नागरिकांचे जिवन सुरक्षित करावे म्हणून नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांनी मनपाचे अपर आयुक्त यांचेशी निवेदनावर चर्चा करतांना शिष्टमंडळात नफिसा अहमद, छाया सुखदेवे, मंजू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!