मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशनने टेकाडी गावात रक्तदान शिबिराने थाटात साजरी करण्यात आली. टेकाडी ग्राम पंचायत नव निर्वाचित सरपंच विनोद इनवाते व माजी ग्रा पं सदस्य दिनेश चिमोटे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करून रक्तदान शिबीरास सुरूवात करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत टेकाडी सदस्य सचिन कांबळे व सतीश घारड हयानी भेट दिली. या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशिय संस्था टेकाडी चे अध्यक्ष निलेश गाढवे, राजे फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन बुराडे, महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना उपाध्यक्ष केतन भिवगडे, महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना सचिव अभिजीत चांदुरकर, कोषाध्यक्ष अतुल कोटकर, अभिजीत कुरडकर, ददु कुरडकर, प्रशांत टाकरखेडे, चंदु नाकतोडे, पवन हुड, अमित वासाडे आदी सह संगठनचे कार्यकर्ते, गावातील युवा वर्ग, गावकरी बहु संख्येने उपस्थित होते.