संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 – कामठी तालुक्यातील आजनी येथील विद्यार्थ्यांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेच्या वतीने रविवार दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी गणेशोत्सवा प्रीत्यर्थ गणपती देवस्थान परिसरात इयत्ता के जी १ ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
भर पावसात या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत लहान मुलांची गर्दी जमली होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दशरथ चौधरी ( पुणे ) यांच्या माध्यमातून प्राप्त देणगीतून नोटबुक, पेन्सिल, रबर, कटर आदी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार देवराव रडके, सभापती उमेश रडके, उपसरपंच दिनेश बडगे, संजय भाऊ जिवतोडे, प्रफुल्ल घोडे, नितीन रडके, बाबुराव धंदरे, बळवंतराव नेऊलकर, कृष्णा दवंडे, हेमराज दवंडे, मोतीराम इंगोले, रघुनाथ रामटेके यांची विशेष उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिलाधर दवंडे, राजेश फुले, अनिकेत इंगोले, अंकित जेवडे, राजकुमार दवंडे, ओम वाट, कार्तिक दवंडे, गजेंद्र वाट, मंगेश कोठाडे, गजेंद्र ढोक, ऋषिकेश भोयर, बादल बोंबाटे, वृषभ हेटे, सचिन ढोले, रितेश उकेबोंद्रे, दीपक घोडे, महेंद्र भोयर, अमित सुमित,अविनाश पारेकर यांनी विशेष सहकार्य केले.
वाचनालयाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्याचे हे १२ वे वर्ष आहे, हे विशेष.