संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
‘गावांची दृष्यमान स्वछता ‘या थिमचा अवलंब करून प्रत्येक गावकऱ्यांनी ‘स्वछता ही सेवा’ मोहीम राबवाबी – बीडीओ अंशुजा गराटे
कामठी :- गावांची दृष्यमान स्वछता या थिमच्या माध्यमातून कामठी तालुक्यात ‘स्वछता ही सेवा’ मोहीम सुरू आहे. ही मोहीम गतिमान करून गावागावात स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत असे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बीडीओ अंशुजा गराटे यांनी कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महालगाव येथे आयोजित सरपंच संवाद सभेत व्यक्त केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पंचायत समिती कामठी येथील महालगाव येथे स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाअंतर्गत गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व उपस्थित सरपंच यांचे सोबत घनकचरा व सांडपाणी तसेच प्लास्टिक कचरा संकलन या बाबत संवाद साधण्यात आला. तसेच ओडिएफ प्लस मॉडेल गावे कशी असावीत यामध्ये गावाची दृष्यमान स्वच्छता, नाडेप द्वारे खतनिर्मिती कशी करावी, तसेच अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत महालगाव चे सरपंच यांनी खात निर्मिती करिता ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले याबाबत मनोगत व्यक्त केले. याबरोबरच कचरा संकलन केंद्राला भेट देऊन उपस्थित अधिकारी गजभिये यांनी सभेमध्ये खतनिर्मिती कचऱ्यापासून कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ओडिएफ प्लस गावे करणेकरीता कोणत्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत जिल्हा कक्षाने सरपंच संवाद कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी मनीष दिघाडे यांनी केले सदर कार्यक्रमांस सर्व सरपंच, सचिव बी. आर. सी., सी .आर. सी. व बचत गटाच्या महिला उपस्थित होते.