संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- वाईल्ड अँनिमल अँड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था नागपुर च्या सर्पमित्रानी कोळसा खदान नं. ६ येथुन एक अजगर प्रजातिचा ६ ते ८ फुटाचा साप पकडुन त्यास वन विभागाच्या जंगलात सोडुन जीवन दान दिले.
कन्हान ला लागुनच असलेल्या कोळसा खदान नं. ६ येथे मंगळवार (दि.३०) जुलै २०२४ ला रात्री ९ वाजता दरम्यान एक अजगर प्रजातिचा ६ ते ८ फुटाचा साप आढळुन आल्याने त्याची माहिती वाईल्ड अँनिम ल अँड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था नागपुरच्या सदस्यांना माहिती मिळताच संस्थेचे सदस्य मंगेश मानकर, राजकुमार बावने व राहुल उके यांनी घटनास्थळी त्वरित पोहोचुन त्या सापाला सुखरूप पकडुन वन विभागाच्या सहकार्याने जंगलात निसर्गवासाकरिता मुक्त संचाराकरिता सोडुन त्या अजगर सापाला जीवनदान देण्यात आले. याप्रसंगी सर्पमित्र मंगेश मानकर, राजकुमार बावने, राहुल उके सहकारी सचिन साळवी, बंटी हेटे, मदीना शेख, संतोष गिरी, प्रफुल सावरकर, शेख हबीब प्रामुख्याने उपस्थित होते.