साडी हा स्त्रीचा अभिमान,सन्मान आणि आदर आहे – डॉ मंजू राठी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठन अंतर्गत माहेश्वरी महिला मंडळ कामठी,कन्हान व माहेश्वरी मंडळ कामठी कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने 8 जून रोजी कामठी शहरात एक साडी वॉकथॉन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.दरम्यान मंडळाचे वरिष्ठ सदस्य डॉ मंजू राठी यांनी सांगितले की साडी हा स्त्रीचा अभिमान,सन्मान आणि आदर आहे ज्याची जाणीव आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या पिढीला करून दिली पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामठी शहरात माहेश्वरी समजाचा उत्पत्ती दिवस श्री महेश नवमी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

कामठी शहरात आयोजित साडी वॉकथॉन रॅली लाला ओली येथून निघत शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत गुड ओली येथील सीताराम मंदिरात समापन करण्यात आले. याप्रसंगीजिल्हा सहसचिव संतोष लखोटीया यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रेमा लखोटीया,सचिव ज्योती राठी सह मंडळाचे समस्त सदस्यांनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध सावकारी करत व्याजाने पैसे देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार - सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी

Sun Jun 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात अवैध सावकाराचे जाळे पसरले असून काही जण अवैध सावकारी बळ करत व्याजाने पैसे देत असल्याचे ऐकिवात येते तेव्हा संबंधित जागरूक नागरिक वा पीडिताने सहाय्यक निबंधक विभाग कामठी कडे पुराव्यानिशी लेखी तक्रार केल्यास बेकायदेशीर व्याजाने पैसे देणाऱ्यावर तसेच सावकारी करणाऱ्या दलालावर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा कामठी येथील सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी यांनी एका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com