– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या शिवाजी नगर कन्हान ता. पारशिवनी जिल्हा नागपूर परीसरात राहणारे सराईत गुन्हेगार खैलेश पंचम सलामे, वय ३३ वर्ष व शुभम उर्फ निखील पंचम सलामे, वय ३० वर्ष, दोन्ही रा. शिवाजी नगर कन्हान ता. पारशिवनी जिल्हा नागपूर हे सख्खे भाऊ असुन ते मागील काही वर्षापासून कन्हान गावामध्ये जवळील आसपासचे भागामध्ये व परिसरात गुंडगिरी करून तेथील नागरिकांना त्रास देत होते. ते नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेले असायचे त्यांनी पोलीस स्टेशन कन्हान परिसरात साथीदारासह दुखापत पोहचवुन जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्रासह दरोडा घालुन गंभीर दुखापत करणे, साथीदारासह गंभीर स्वरूपाची दुखापत पोहचविणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन प्राणघातक शस्त्राने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अवैध प्राणघातक शस्त्रे बाळगणे, घातक हत्याराने गंभीर जखमी करून लुटपाट करणे, गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलीसांना ते करत असलेल्या कामात अडथळा निर्माण करणे, अवैध प्राणघातक हत्यार / अग्निशस्त्र बाळगणे, साथीदारासह जबरी चोरी करून दुखापत करणे, जुगार खेळणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे तसेच महीलांची छेड काढणे यासारखे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत. त्यांच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये ते आपले स्वतःची भीती निर्माण करुन दहशत पसरवित होते. नागपूरः ग्रामीण पोलीसांना त्यांचेविरुध्द जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्या दोषांचेही विरुद्ध गुन्हे नोंद करून त्यांना अटक करून कारागृहात पाठविले आहे. परंतु खैलेश पंचम सलामे, वय ३३ वर्ष व शुभम उर्फ निखील पंचम सलामे वय ३० वर्ष यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्यांचेविरूद्ध प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु त्यांनी आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. त्यांचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडुन MPDA कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. २९/०७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, नागपूर यांनी खैलेश पंचम सलामे, वय ३३ वर्ष रा. शिवाजी नगर कन्हान ता. पारशिवनी जिल्हा नागपूर यांचे विरुध्द स्थानबध्दता आदेश काढला असून त्यानुसार त्यांना मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. परंतु त्याचा भाऊ शुभम उर्फ निखील पंचम सलामे, वय ३० वर्ष, रा. शिवाजी नगर कन्हान ता. पारशिवनी जिल्हा नागपूर याला स्थानबद्धतेच्या आदेशाबद्दल शंका आल्याने तो कन्हान परीसरातून फरार झाला. त्याचा पोलीसांनी शोध घेतला असता तो आजपर्यंत मिळुन आला नाही. त्याचा कन्हान पोलीस शोध घेत आहे. याच दोघा भावाने काही दिवसापुर्वी कन्हान च्या रस्त्यावर तलवार घेवुन दुकान लुटले होते. याबाबत त्याचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर त्याला अटक केले होते.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात मकेश्वर, ठाणेदार पो.स्टे. कन्हान स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक चव्हान, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, सहायक फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार निलेश बर्वे, मुदस्सर जमाल, पोलीस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.