सराईत गुन्हेगार प्रमोद राजेद्र सहानी याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीणची कारवाई

नागपूर :-पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या खदान नं ०३ ता. पारशिवनी जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी वय २४ वर्ष रा. खदान नं ३ कन्हान जि नागपूर याने पोलीस स्टेशन रामटेक व कन्हान परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. सदर सराईत अपराधी हा शरीराविरूध्द व मालमत्ते संबंधात गुन्ह करण्यात अग्रेसर असल्याने त्याचे या कृत्यामुळे सामान्य जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. अश्या या धोकादायक गुन्हेगाराविरूध्द नागपुर ग्रामीण पोलीसांनी बरेच वेळा प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तसेच त्यांचे विरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्हयात त्याला वारंवार अटक सुध्दा करण्यात आली. व त्याचे वर्तणुकीत सुधारणा व्हावी या हेतुने त्याला कारागृहातही पाठविण्यात आले. परंत कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याचेमध्ये कोणताही सुधारणा झाली नाही. याउलट तो अधिक निडर व दुःसाही होत गेला. त्याने साथीदारासह दुखापत पोहचवून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे, साथीदारासह जबरी चोरी करून ईच्छापुर्वक दुखापत पोहचविणे, घरफोडी करणे, जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे करत गेला. त्यामुळे परीसरात राहणा-या नागरीकांमध्ये त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली. यामुळे त्याचेवर नियंत्रण ठेवून त्याचेवर प्रभावी कारवाई करणेकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए पोदार यांनी ठाणेदाराला कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार रामटेक चे ठाणेदार यांनी सदर गुन्हेगाराविरुद्ध एमपीडिए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी, नागपूर यांना सादर केला. जिल्हाधिकारी यांनी सदर स-हाईत गुन्हेगाराची वृत्ती व त्याने केलेले गुन्हे तसचे त्याने कन्हान व रामटेक परीसरात माजविलेला दहशत लक्षात घेता सदर गुन्हेगाराविरूद्ध योग्य ती दखल घेवुन त्यास ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश दिल्याने स-हाईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी यास दिनांक २४/०९/२०२३ रोजी मध्यवर्ती कारागहु नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, हर्ष ए पोदार, व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार पोलीस निरोधक हृदयनारायण यादव तसचे स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक आशिष ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, सहायक फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार निलेश बर्वे, पोलीस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चारीत्र्यावर संशय घेवुन पत्नीचा केला खून

Tue Sep 26 , 2023
खापरखेडा :- अंतर्गत मौजा वार्ड क्र. ०१ भानेगाव ०२ किमी पूर्व येथे यातील आरोपी हा आपली पत्नी रंजना मनोहर मनगटे वय ४५ वर्ष हीचे चारित्र्यावर नेहमी संशय घेण्याच्या स्वभावाचा असून तो याच कारणावरून वादविवाद करून पत्नीला मारहाण करीत होता. दिनांक २३/०९/२३ से १५/४५ ते १६ / १२ वा. दरम्यान, यातील आरोपी यांने घरी कोणी नसतांनी आपल्या पत्नीचे चारित्रावर संशय घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com