संतकवी कमलासूतांच्या जीवनीचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरीच्या हस्ते अनावरण

चंद्रशेखर वराडपांडे हे आध्यात्मिक उपासक , नितीनजी गडकरीचे गौरवोदगार...
 नागपुर – विदर्भातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, गीतकार, काव्यलेखक, शेगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराज व महाशक्ती अनसूयामातेचे निस्सीम भक्त व प्रचारक, रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संस्थापक वै. वंदनीय संतकवी कमलासुत (बाबा) श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढी सुसंस्कृत व्हावी या वै. वंदनीय संतकवी कमलासुत श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या जीवनी फलकाचे उदघाटन भारत सरकार चे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते भाविकवृंदांच्या उपस्थितीत
 करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार सर,दक्षिण नागपूरचे भाजपा मंडळ अध्यक्ष देवेनजी दस्तुरे, गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संयोजक श्री गिरीशजी वराडपांडे, ऍड रमण सेनाड, डॉ श्रीरंग वराडपांडे आदी मान्यवर  उपस्थित होते.
चंद्रशेखर वराडपांडे संतकवी कमलासुत हे अध्यात्मिक उपासक असून हजारो भक्तपरिवाराला त्यांनी भक्तिमार्गाद्वारे धर्म जागरण व  जीवन जगण्याचा संदेश दिला, उत्कृष्ट नाट्यलेखक, गीतकार असून त्यांच्या लेखन व काव्याचा तसेच त्यांनी केलेल्या ईश्वरीय सेवाकार्याचा प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी लोकजागृती मोर्चा नागपूर चे संयोजक ऍड रमणजी सेनाड यांनी पुढाकार घेऊन गजानन चौक रेशीमबाग येथील संतकवी कमलासुत  नामकरण मार्गांवर  त्यांच्या साहित्याची माहिती देण्यात आली.या जीवनीचे वाचन ऍड रमण सेनाड यांनी केले.याप्रसंगी रेशीमबाग येथील नागरिक व  गजानन महाराज श्रद्धास्थानातील भक्त परिवार मोठया संख्येत उपस्थित होता.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरीच्या हस्ते  भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Fri Apr 22 , 2022
भजनातून भक्तीचा आनंद घ्या -केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरिंचे उदगार.. नागपुर – अमृतधारा आणि मातृशक्ती रेशीमबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य भजन स्पर्धेची महाअंतीम फेरीचे बक्षीस वितरण गडकरीच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, याप्रसंगी माननीय नितीनजी गडकरी यांनी गजानन महाराज श्रद्धा स्थानात जाऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले आणि संतकवी कमलासुत मार्गावरील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com