सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७० प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता: १९) रोजी उपद्रव शोध पथकाने ७० प्रकरणांची नोंद करून २९ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २५ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून १ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ३ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २७ प्रकरणांची नोंद करून ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०७ प्रकरणांची नोंद करून ०७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवार (ता: १९) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. मन्ना कन्स्ट्रक्शन, गांधीबाग झोन येथील श्री नंद चेलवाणी बिल्डर्स यांच्यावर कार्यवाही करीत प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०९ प्रकरणाची नोंद करून ६० हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपींना नागपूर ग्रामीण पोलीसांनी केले गजाआड

Wed Mar 20 , 2024
– उत्तरप्रदेश येथुन मोठ्या प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल जप्त नागपूर :- फिर्यादी संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११/१२/२०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशन‌द्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंग‌द्वारे विवीध तारखेला एकुण ११,४०,०००/- रूपये जमा करून शेयर मध्ये गुंतवणुक केली. दि. ३१/१२/२०२३ रोजी फिर्यादीस फायदा झाल्याचे दिसुन येताच फिर्यादीस झालेली फायदयाची रक्कम विड्रॉल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights