कन्हान :- श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे संत संताजी जगनाडे महाराजांची ४०० वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
रविवार (दि.८) डिसेंबर २०२४ ला दुपारी १२ वाजता श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे संत संताजी जगनाडे महाराजांची ४०० वी जयंती निमित्य याप्रंसगी श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कांद्री संच फजित बावणे, धनराज क्षिरसागर, ज्ञानेश्वर गिरे, राजेश पोटभरे , रविन्द्र कांबळे, शिवाजी चकोले सेवकराम गायकवाड, गुरुदेव चकोले, क्रिष्णा पोटभरे यांनी संताच्या अभंग हरी भजनात गायन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष झिबल सरोदे, प्रमुख पाहुणे मा. बलवंत पडोळे माजी सरपंच, नरहरी पोटभरे अध्यक्ष ब्लाक डायमंड सोसायटी कामठी काॅलरी, अतुल हजारे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश चाफले, अनिल पोटभरे, वासुदेव आखरे आणि समस्त गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक वामन देशमुख, विजय आखरे, संदीप कापसे, सेवक भोंडे, प्रविण आखरे, शैलेश हिंगे, गुरुदेव चकोले, बंटी सरोदे, श्याम मस्के, धनराज ढोबळे, प्रशांत देशमुख, रोहित चकोले, मनोज भोले, लोकेश वैद्य आदीनी सहकार्य केले.