– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी विभागाचे विजयादशमी उत्सव संपन्न
नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सहा उत्सव असतात त्यामध्ये विजयादशमी उत्सव हा प्रमुख उत्सव असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे संघाची स्थापना केली संघ स्थापनेच्या 99 वर्षात पदारपण केले आहे. दरवर्षी विद्यार्थी विभागाचा विजयादशमी व शस्त्रपूजा उत्सव नगरात साजरा करण्यात येतो. यावर्षी सुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यवतमाळ नगराचा विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव दिनांक 2 ऑक्टबर 2024 रोजी विवेकानंद विद्यालय यवतमाळ येथे सायंकाळी 5.30 वाजता प्रमुख अतिथी परेश राजकुमार राठी संचालक राठी क्लासेस, तसेच नितीन सू जांभोरकर प्रांत महाविद्यालयीन कार्य प्रमुख नागपूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच पथ संचलनाला सायंकाळी 4.30 वाजता विवेकानंद विद्यालय येथून सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी योगासन, सांगिक व्यायाम योग, सुभाषित, अमृत वचन, वैयक्तिक गीत, सांघिक गीत सादर करण्यात आले. विजयादशमी उत्सवात उपस्थित प्रमुख अतिथी यांनी उपस्थित यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण काळाची गरज आहे सर्वांनीच शिक्षणावर लक्ष केंद्रित करून ध्येय साधले पाहिजे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच नितीन जांभोरकर यांनी संघाविषयी माहिती देत संघ काय आहे आणि संघ कसे काम करते तसेच संघाचे महत्व पटवून दिले. संघाच्या शाखेत संस्काराचे कसे घडण होते. आपल्या पूर्वजांनी कसे कार्य केले त्यांच्या जीवनाची पुन्हा आठवण करून दिली सदर उत्सवाला जिल्हा संघचालक विलास देशमुख, नगर संघचालक धनंजय पाचघरे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.