संजय राऊत यांची जामीन मिळताच पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, आता मी पुन्हा…

मुंबई :- उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष केला आहे. पेढे वाटून आणि फटाके फोडून हा जल्लोष करण्यात येत आहे. राऊत यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या घरीही त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. तर शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याचं स्वागत केलं आहे. कोर्टाने जामीन दिल्यानंतर राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केलं आहे.

खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी कोर्ट परिसरात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी कोर्टाचा आभारी आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. आता मी पुन्हा लढणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत यांची ही प्रतिक्रिया सूचक असल्याचं मानलं जात आहे.

राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यामुळे त्यांना आर्थर रोड तुरुंगातून पीएमएलए कोर्टात आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या जामिनावर सुनावणी करताना कोर्टाने राऊत यांना दोन लाखाच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला.

राऊत यांचा जामीन मंजूर होताच राज्यभर जल्लोष सुरू झाला आहे. तसेच राज्यभरातून प्रतिक्रियाही उमटत आहेत. संजय राऊत हे शेवटपर्यंत झुकले नाही. त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांचे अभिनंदन, असं समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आजमी यांनी म्हटलं आहे.

न्यायदेवतेवर आमच्या विश्वास आहे. संजय राऊत हे आईची भेट घेतील. त्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातील, असं आप्पा राऊत यांनी सांगितलं

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान 

Wed Nov 9 , 2022
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच कामाला लागले आहेत. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकिचा फायदा हा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. या दरम्यान अनेक वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. शिवसेनेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!