नागपूर :- मनपा जेष्ठ नागरिक कक्षात पुज्य साने गुरूजी यांची 125 वी जयंती सिनियर सिटीझन कौन्सील ऑफ नागपूर डिस्ट्रीक्ट व्दारे साजरी करण्यात येत असुन मुख्य अति म्हणून आंचल गोयल, अति आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त मनपा व डॉ. रंजना लाडे उपायुक्त पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोहर खर्चे राहतील असे मनपा ज्येठ नागरिक कक्ष व संस्थेचे सचिव सुरेश रेवतकर यांनी कळविले असून सर्व जेष्ठ नागरिक मंडळाचा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ – मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष, सिव्हील लाईन, नागपूर
वेळ – सकाळी 11 वा. मंगळवार दि.24-12-2024