नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिम्नॅस्टिक स्पर्धेत 10 वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये समर वानकर आणि मुलींमध्ये अद्विता चेलानी विजयी ठरले. काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स प्रकारात शिवाजी जिम्नॅस्टिक क्लबचा समर आणि अल्टीमेट जिम्नॅस्टिक क्लबची अद्विता यांनी बाजी मारली.खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत जिम्नॅस्टिकस स्पर्धेचे उदघाटन समारंभ धनवटे नॅशनल कॉलेज येथील स्टेडियम मध्ये नागपूर डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक बारड यांच्या अध्यक्षतेत पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. अनिल सोले, धनवटे नॅशनल कॉलेजचे शाररिक शिक्षण विभागीय प्रमुख डॉ. देवेंद्र वानखडे, कनिष्ठ महाविदयालय पर्यवेक्षक जयंत जिचकार, HERD ग्रुप ऑफ कंपनी चे संचालक डॉ. अमोल देशमुख, सुचिका देशमुख, डॉ. सुभाष दाडे, पूर्व नगरसेवक लखन येरवार, खासदार समिती जिम्नॅस्टिकस खेळाचे कॉडीनेटर लक्ष्मीकांत किरपाने, माजी खेळाडू ललित कुकडे, सिद्धार्थ श्रीरामे, प्रेमचंद दुबे, विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व प्रथम दीपप्रज्वलन, हनुमंताच्या प्रतिमेस माल्यार्पण व नारळ फोडून स्पर्धेचे उद्दघाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू अवनी राठोड रिदमीक जिमन्यास्टिक्स, आर्टिस्टिक जिमन्यास्टिक्स- कार्तिकी माटकर – व्होलटिंग टेबल , आर्या रंनावरे व दर्शील चंदनखेडे – फ्लोअर एक्सरसाईज, मधुरा कलाने – बॅलेंसिंग बीम, ईशान कालबांडे -पोमेल होर्स, कैवल्य फटिंग – पॅरालल बार यांनी उत्कृष्ट असे प्रदर्शन उपस्थित मान्यवरांसमोर सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन आरती पांडे व मयुरेश शिर्शिकर तर आभार संकेत विंचूरकर यांनी मानले.
शनिवारी 14 जानेवारी 2023 रोजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 वर्ष, 12 वर्ष,17 वर्ष व खुल्या वयोगटातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
आजचे निकाल
आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स
वयोगट 10 खाली (मुले) :
प्रथम- समर वानकर (शिवाजी जिम्नॅस्टिक क्लब)
व्दितीय – लिखित डुकरे (डी.एस.ओ जिम्नॅस्टिक)
तृतीय – प्रथम गायधने (शिवाजी जिम्नॅस्टिक क्लब)
वयोगट 10 खाली (मुली) :
प्रथम – अदविता चेलानी (अल्टीमेट जिम्नॅस्टिक क्लब)
व्दितीय – राहिण्या गुल्हाने (शिवाजी जिम्नॅस्टिक क्लब) तृतीय – वसुंधरा हिवसे (शिवाजी जिम्नॅस्टिक क्लब)