संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वातंत्र्य चळवळीत अग्रगण्य असलेले भारतीय आदिवासी स्वतंत्रता सेनानी वीर बिरसा मुंडा यांना शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथील ग्राम पंचायतीच्या नव निर्मित इमारतीत जयंती प्रित्यर्थ अभिवादन करण्यात आले.
आजनी येथे आदिवासी समुदायाची संख्या मोठया प्रमाणात असून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण सामान्य जनतेला व्हावे, त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी ग्राम पंचायत आजनीच्या वतीने वीर बिरसा मुंडा जयंती साजरी केली जाते.
याप्रसंगी गावातील आदिवासी समुदायाचे ज्येष्ठ नागरिक तिमाजी खंडाते यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ग्राम पंचायतीचे सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, सचिव आतिष कुमार देशभ्रतार, पंचायत समिती सदस्य उमेश रडके, सदस्य गणपत झलके, शंकर भोयर, हेमलता उकेबोंदरे, गायत्री हरणे, प्रियंका किरणायके, लाईनमन अरुण, शेषराव भोयर, दीपक खंडाते, निखिल सुरपाम, अभिषेक दवंडे, प्रदीप खंडाते, नारायण वैद्य, निखिल लायबर, ललित सलामे, संकेत रडके यांची प्रमुख उपस्थिती होती. नियोजन ग्राम पंचायत आजनीने केले होते.