चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आज २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपआयुक्त रवींद्र भेलावे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. त्यांनी देशासाठी अनेक वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. यावेळी सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर,विधी अधिकारी अनिल घुले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.