नागपूर :- भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते व प्रदीप कुळकर्णी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपायुक्त कुळकर्णी यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. नाझर अमित हाडके, सहायक अधिक्षक अक्षय रोटकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.