राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून अभिनंदन

नागपूर :- पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मिनीगोल्फ या खेळात सुवर्ण पदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

इंडियन ओलंपिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ओलंपिक असोसिएशन व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनिगोल्फ या खेळाचे आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मीरामार बीच येथे करण्यात आले होते.

माजी महापौर संदीप जोशी, रितेश गावंडे, साहेबराव इंगळे, दिलीप दिवे, रमेश शिंगारे व अजय हिवरकर आदी सामाजिक कार्यकर्ते खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रेरित करावे - राज्यपाल रमेश बैस

Mon Nov 20 , 2023
– राज्यपालांच्या उपस्थित नौदलातर्फे आयोजित जी – २० प्रश्नमंजुषेची राष्ट्रीय अंतिम फेरी संपन्न मुंबई :- भारतीय नौसेनेतर्फे जी – २० देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा ‘थिंक – क्विझ’ ची राष्ट्रीय पातळीवरची अंतिम फेरी राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १८) गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही पब्लिक स्कुल गुरुग्रामच्या विजयी चमूला सन्मानित करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com