राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते.

राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी चौक येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालयाच्यावतीने रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Tue Oct 3 , 2023
– दोन दिवसात 2.25 लाखाच्या वस्तूंची विक्री – 8 ऑक्टोबरपर्यंत राहणार खुले नागपूर :- आज खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून दोन दिवसात 2 लाख 25 हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली आहे. ग्राहकांसोबतच प्रदर्शनी पाहवयास येणाऱ्या प्रेक्षकांची सुध्दा गर्दी वाढत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महात्मा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com