कन्हान :- श्री संत संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे साजरी करण्यात आली.
शनिवार (दि.२८) डिसेंबर २०२४ ला सायंकाळी संत संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोचे विधिवत पूजन कृष्णा किरपान, शामराव चकोले, केशव मस्के, गंगाधर सरोदे, जेष्ठ नागरिक व प्रमुख मान्यवर बलवंत पडोळे, माजी सरपंच, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल पोटभरे, ईश्वर कामडे, मारोती आष्टनकर, प्रविण आखरे, शैलेश हिंगे, सिताराम बावनकुळे, भैय्या मेहर कुळे, राजेश पोटभरे, शिवशंकर चकोले, आनंद देशमु ख, आकाश कापसे सह ग्रामस्थ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्याबद्ल माजी सरपंच बलवंत पडोळे, अनिल पोट भरे, राजु देशमुख हयांनी संबोधित केले. आरती, प्रसाद, अल्पोहार वाटप करण्यात आला. सुत्रसंचालन श्याम मस्के यानी आभार प्रदर्शन प्रशांत देशमुख यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक वामन देशमुख, धनराज ढोबळे, रोहित चकोले, लोकेश वैघ, मनोज भोले, सेवक भोंडे, विजय आखरे, संदीप कापसे आदीने सहकार्य केले.