यवतमाळ :- भारत देशात 60 टक्के मुलं-मुली लोहतत्वा अभावात अॅनिमीया व दम्याने पिडीत आहे. लोहतत्वाने केवळ हिमोग्लोबींग वाढते, असे नव्हेतर बालकांच्या मेंदूच्या वाढीसाठी लोहतत्व आवश्यक घटक असल्याचे अ.भा. बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजीय जोशी यांनी सांगितले. ते येथील अंजुमन शाळेत आयोजीत बालरोग वैद्यकीय तपासणी शिबीरात बोलत होते.
अॅनिमीया व अस्थमा रोगाविषयी जागरुकता अभियान देशभर सुरु आहे. त्याअंतर्गत भारत भ्रमणावर निघालेली तज्ज्ञ चमु सुसज्ज व्हॅन यवतमाळात आली आहे.
यावेळी अंजुमन ग्रुप ऑफ स्कुल व रोटरी क्लब ऑफ यवतमाळचे अध्यक्ष जाफर सादिक गिलाणी म्हणाले की, पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या पोषक आहार व आवश्यक उपचाराविषयी दक्षता घेण्याचे आवाहन केले.
यवतमाळ बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चव्हाण यांनी अॅनेमीया व अस्थमाच्या लक्षणाविषयी माहिती दिली. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी पाटील, डॉ. रुपाली साळवे, डॉ. लीना मानकर, डॉ. स्वप्नील मानकर यांनी शिबीरात 6 ते 12 वयोगटातील मुलांची तपासणी केली व आवश्यक औषधे देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापक अब्दुल रफीक यांनी स्वागतपर व रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनचे सचिव दिपक हिंडोचा यांनी आभार प्रदर्शन केले. शिबीरासाठी रोटी क्लब मिडटाऊनचे प्रकल्प अधिकारी शोहेब शिवाणी, अजय भूत व सारंग बुरडकर यांनी परिश्रम घेतले.