संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महसूल विभागामार्फत कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आज 5 ऑगस्ट रोजी कामठी तहसील कार्यालयातील महसूल विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे तहसील कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी ‘कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येतील माजी सौनिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमा अंतर्गत तहसीलदार अक्षय पोयाम , दुय्यम निबंधक अनिल भिवगडे,नायब तहसीलदार राजाराम बमनोटे, नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर यांच्या मुख्य उपस्थितीत माजी सैनिक तसेच सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबीतांची प्रलंबित कामे तसेच तक्रारींबाबत संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.तसेच त्यांच्या शासकीय कामाबाबतच्या अडीअडचणी व तक्रारी बद्दल समाधान करण्यात आले.त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक अनिल भिवगडे यांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला.
हा कार्यक्रम तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.याप्रसंगी माजी सैनिक दिवाकर नांदेकर,चुडामन वासनिक,विष्णू ठवरे,पंजाब पाटील, दत्ता गवई, के लूटे, पी जनबंधु,अरविंद , ए जनबंधु,जी आर गाडगे, जयप्रकाश वासनिक,महादेव, दिनेश पांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रस्तुतकार अमोल पौड यांनी मानले.