सुदर्शन आठवले यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 जाहीर

नवी दिल्ली :- साहित्य अकादमीने 2024 साठीच्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा असून, मराठी भाषेसाठी हा सन्मान सुदर्शन आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी गुरचरण दास लिखित इंग्रजीतील ‘द डिफिकल्ट ऑफ बींग गुड’ ( ‘The Difficulty of Being Good’ )या साहित्यिक समीक्षेचे उत्कृष्ट मराठी अनुवाद केला आहे.

साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक रवींद्र भवन, येथे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 2024 साठीच्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारांसाठी 21 भाषांतील पुस्तकांची निवड करण्यात आली.

परीक्षक मंडळ व पुरस्काराविषयी

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी प्रत्येक भाषेसाठी तीन सदस्यीय परीक्षक मंडळ कार्यरत असते. मराठी भाषेसाठी परीक्षक मंडळात निशिकांत ठाकूर, प्राची गुजरापध्याय-खंडेपारकर आणि निशा संजय डांगे यांचा समावेश होता.

या पुरस्कारांतर्गत ₹50,000/- रोख रक्कम आणि ताम्र प्रशस्तिपत्र प्रदान केले जाते. हा सन्मान लवकरच एका विशेष समारंभात दिला जातो.

सुदर्शन आठवले यांचा मराठीत सखोल अभ्यास असून, त्यांनी इंग्रजीतील महत्त्वपूर्ण साहित्य मराठीत आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Honoring Female Conductors on International Women's Day

Mon Mar 10 , 2025
Nagpur :- On the occasion of International Women’s Day, we take immense pride in recognizing and honoring the dedication and commitment of our female conductors and employees. These women play a vital role in public service, managing passenger interactions with professionalism and resilience throughout the day. Their unwavering service ensures safe and efficient transportation for countless passengers daily. In acknowledgment […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!