कन्हान व कांद्रीला राजे संभाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड कन्हान कार्यालयात व कांद्री येथे शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्री द्वारे छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती निमित्य अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड कन्हान

शनिवार (दि.१४) मे २०२२ ला मराठा सेवा संघ कार्यालय रेंघे पाटील भवन तारसा रोड कन्हान येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते व ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकीक कार्य शैलीवर मार्गदर्शन करून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास संभाजी महाराजाचा ख-या इतिहास अवगत करून दिला तर एक आदर्श व प्रचंड ऊर्जा असलेले युवा आपल्या कुंटुबासह देशाचे नाव लौवकीक करणारी पिढी घडविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे ताराचंदजी निंबाळकर, राजेंद्र मसार, राजुजी रेंघे, वसंतराव इंगोले, संभाजी ब्रिगेड कन्हान चे राकेश घोडमारे, अमोल डेंगे, बाळा मेश्राम, ऋृतिक रेंघे, सुमित खैरकार, आशिष इंगोले, उत्कर्ष रहाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्री द्वारे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी

कांद्री येथे शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्री द्वारे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती निमित्त महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.
शनिवार (दि.१४) मे ला राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती निमित्य कांद्री येथे शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्री द्वारे कार्यक्रमाचे आयो जन करण्यात आले असुन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिका-यांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित व विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गणेश सरोदे, लोकेश आंबाळकर, रोहिल चकोले, श्याम मस्के, प्रविण नांदुरकर सह युवक व नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बोरडा येथे दलित वस्ती व १५ वे वित्त आयोग च्या दहा लाख निधी बाधकामचे भुमीपुजन

Sun May 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – जिल्हा परिषद गोडेगांव अंतर्गत ग्रा प बोरडा (गणेशी) येथे जिल्हा परिषद बाधकाम विभागा व्दारे दलित वस्ती सुधार निधीचे ८.५ लाख रू व १५ वे वित्त आयोग चे १.५ लाख निधीचे भुमिगत नाली बाधकाम असे एकुण १० लाख निधी च्या बाधकामा चे भुमिपुजन करण्यात आले. ग्राम पंचायत बोर्डा (गणेशी) गावात भुमिगत नाली चे बाधकाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com