नागपूर :- दि.२०/७/२०२४ रोजी नागपूर शहरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. संततधार पाऊस सुरू असल्याने नागपूर शहरात विविध ठिकाणी खोलवर भागात तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलेले होते. हवामान खात्याने देखील नागपूर शहराकरिता १८ ते २१ जुलै च्या दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली होती व सदर कालावधी करिता ऑरेंज अलर्ट दिलेला होता. दि.२०/७/२४ रोजी स.९.०० वा वाहतूक लकडगंज विभागा अंतर्गत सीए रोड येथील चंद्रशेखर आझाद चौकात वाहतुकीचे नियमन करण्याकरिता नापोशी रुपेश नानवटकर नेमणूक लकडगंज वाहतूक विभाग यांचे कर्तव्य लावण्यात आलेले होते. नागपूर शहरातील मुसळधार पावसामुळे तुंबलेल्या पाण्याची स्थितीचा आढावा घेण्याकरिता नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे नागपूर शहरात पाहणी करिता निघाले होते. सीए रोडने प्रजापती चौकाकडे जात असताना दरम्यान स. १०.३० वाजेच्या सुमारास वाहतूक लकडगंज विभागाचे नापोशि रुपेश नानवटकर चंद्रशेखर आझाद चौकात कर्तव्य बजावताना दिसून आले. ते पावसाची तमा न बाळगता पावसात भिजून पावसामध्ये वाहतुकीचे नियमन करून कर्तव्य चोखपणाने बजावताना निदर्शनास आले. पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या या कर्तव्याची दखल घेतली. त्यांनी बजाविलेल्या कर्तव्यामुळे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी त्यांना त्यांच्या या कर्तव्य तत्परतेबाबत पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावून त्यांच्या या कार्याबद्दल प्रशंसा केले व त्यांना पुष्पगुच्छ तसेच प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार केला.