– लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूल कोंढाळी येथील प्रकार,शिक्षणाच्या नावावर खुली लूट, विश्वासाला तडा गेला
नागपुर :- नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा , नागपूर वरुन ५० कि.मी.अंतरावरील कोंढाळी येथील नावलौकिक सी.पी.ॲन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूल कोंढाळी मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी RTE 2009 च्या कायद्यानुसार दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचा अधिकार कायदा RTE 25% अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणा पासून वंचित ठेऊन त्यांची दिशाभूल करुन नियमांचे उल्लघंन करीत त्यांच्या कडून सतत १२ वर्षा पासून लाखो रुपये वसूली केली असल्याची तक्रार शिक्षण विभागाला करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून नागपूर विभागात प्रथमच अशी एवढी मोठी कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.
RTE 25% प्रवेशाचे प्राथमिक उद्दीष्ट असे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करणे आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार नामांकित खाजगी शाळांमधील प्राथमिक ते आठवी इयत्ते पर्यंतच्या २५% जागा आरटीई ॲडमिशन अंतर्गत राखीव आहेत या कार्यक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य आहे
RTE 25% मोफत शिक्षण प्रवेश प्रक्रिया ही अगोदर ऑफलाईन पद्धतीने केली जात होती याचाच फायदा घेत मुख्याध्यापिका यांनी पालकांन कडून कागदपत्रे गोळा केले मात्र RTE 25% मोफत शिक्षण प्रवेश प्राप्त झालेल्या पाल्यांच्या पालकांना याबाबत माहिती न देता, तसेच त्यांची दिशाभूल करुन ,मनमानी कारभार करीत RTE प्रवेश प्राप्त पाल्यांच्या पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार हा ऑनलाईन प्रकिया सुरू झाल्यानंतर ही सुरू असून हा प्रकार अत्यंत घृणास्पद व अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असुन सदर शाळेमध्ये हा प्रकार घडल्याचे निष्पन्न होत आहे .
मात्र पालक जागृत झाल्याने व प्रकरण अंगलट आल्याचे पाहून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यात अपयश आल्याचे लक्षात येताच अखेर शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी कोंढाळी व परीसरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या घरी शाळेच्या लेटर पॅड वर सही शिक्का मारुन RTE 25 % मोफत शिक्षणाचा हक्क अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे भरलेले रुपये परत घेऊन जावे अशा प्रकारचे कबुली पत्र पाठविले पत्र वाचून अनेक पालक आच्छर्यचकीत झाले अनेकांना तर याबाबत माहितीच नव्हते तर अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या नावलौकिक शाळेने आमच्या सोबत अशी कशी धोकेबाज केली?? तेव्हा याची सखोल चौकशी करून लाखो रुपयांचा घबाळ बाहेर निघावा अशी पालकांची इच्छा असून जनसामान्यांत ही चर्चा केली जात आहे.तसेच सदर शाळेमधील घडलेल्या अन्य घटनेची सुद्धा शिक्षण विभागाला लेखी तक्रार करण्यात आलेली असून याची सुद्धा सखोल चौकशी करून सदर शाळेवर कारवाई व्हावी व वरीष्ठ अधिकाऱ्यांन कडून या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहेत.
नावलौकिक असलेल्या शाळेमध्ये असला प्रकार घडल्यामुळे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या शिक्षणाच्या नावाखाली फक्त बाजारीकरण करून लुटमारीचा मुख्य केंद्र बनले असून कोंढाळी व परीसरातील पालक वर्ग चिंताग्रस्त झाले असून आता आपल्या पाल्याला अशा महागड्या सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायला पाहिजे किंवा नाही ह्या संभ्रमात असल्याने यावर्षी शाळेच्या अनेक शिक्षक व शिक्षीका भर उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात घरो – घरी जाऊन शाळेचे गुण गाणं करीत शाळेत प्रवेश घेण्यासाठी खूप विनवणी करत आहे यामुळे त्यांना तारेवरची खूप कसरत करावी लागत आहे. मात्र खरे तर आज शिक्षणाच्या नावावर ” बोली सुरत, दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे” असे चित्र निर्माण झालेले दिसत आहे.
आरटीई २५% मोफत शिक्षणाचा लाखो रुपयांचा घोळ मर्यादित नसून सीबीएसई १० वी बोर्डाने यावर्षी १५०० रुपये परीक्षा शुल्क ठरविले होते मात्र शाळेने नियमांचे उल्लघंन करून प्रत्येक विद्यार्थ्यांन कडून २१०० रुपये घेण्यात आले असून याची सुद्धा शिक्षण विभागाला तक्रार करण्यात आली असून घेतलेला अतिरीक्त पैसा परत करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूल कोंढाळीच्या अनेक भोंगळ कारभाराच्या तक्रारी शिक्षण विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आली असून चौकशी करीता मुख्याध्यापिका यांना शिक्षण विभागाच्या कार्यालयात व पोलीस विभागात चकरा माराव्या लागत आहे.