विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी २११ कोटी रुपयांचा निधी – मंत्री संजय राठोड

मुंबई :- विदर्भासाठी महत्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी ९७६ प्रकल्पांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीसाठी २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

माजी मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमिनदारांनी लोकसहभागातून, सिंचनासाठी तयार केलेले तलाव होते. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे. या तलावांतून पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री राठोड यांनी नुकतीच बैठक घेतली होती.

विदर्भातील सुमारे ९,२८० माजी मालगुजारी तलावांपैकी सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील ३४२ तलावांच्या दुरूस्तीसाठी ४४.०७ कोटी, भंडारा जिल्ह्यातील ७४ तलावांच्या दुरूस्तीसाठी २२.४१ कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०.३३ कोटी, व गडचिरोली जिल्ह्यातील १०० तलावांच्या दुरूस्तीसाठी २४.२४ कोटी असे एकूण २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.

मंत्री राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेऊन लवकर निधी मिळण्यास मान्यता मिळावी, यासाठी पाठपुरावा केला आहे. तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे दर्जेदार होण्याकरिता संबंधित अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री राठोड यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिलखुलास','जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत

Sat Mar 16 , 2024
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सर ज. जी. स्कुल ऑफ आर्ट या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यातील तसेच कलेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत असलेले सर ज.जी स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय ही अग्रगण्य कलाशिक्षण संस्था आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. त्याअनुषंगाने या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com