रोजगार मेळा भारताच्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल – केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचे प्रतिपादन

– केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्र प्रदान

नागपूर :-आज नागपूरमध्ये भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्था , भारतीय खाण ब्युरो , आयकर , डाक विभाग, सांख्यिकी विभाग , कर्मचारी भविष्य निधी संघटन , एम्स , कर्मचारी विमा महामंडळ , केंदीय प्रत्यक्ष कर मंडळ या केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्र दिले जात आहे .

भारताच्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असून देशाला विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे , असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज नागपुरात केले . याप्रसंगी नागपूर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त के.एम. बाली, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी –एनएडीटीचे प्रधान महासंचालक संजय पुरी , ईपीएफओचे आयुक्त शेखर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून देशभरात 71 हजार नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम झाला .त्यावेळी नागपूरातील राजनगरस्थित राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय –एनएफएससी येथील सभागृहात अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण झाले . याप्रसंगी चौबे यांच्यासह आयकर , ईपीएफओ , वस्तू सेवा कर विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पंतप्रधानांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण बघितले . या मेळ्यात आयकर, वस्तू सेवा कर, ईएसआयसी, डाक विभाग, रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करुन उद्योजकांनी उद्योग उभारावेत - योगेश कुंभलवार

Sat Jan 21 , 2023
गडचिरोली :- गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी युवक- युवतींनी उपलब्ध नैसर्गिक साधन संपदेवर आधारित उद्योग उभारुन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग सहसंचालक, मैत्री मुंबई, योगेश कुंभलवार यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली मार्फत दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी व्यवसाय सुलभीकरण एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आर.सेटी. हॉल, प्रशिक्षण केंद्र कॉम्पलेक्स, गडचिरोली, बँक ऑफ इंडिया येथे करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com