नागपूर :- फिर्यादी शिवप्रसाद रामदास बनवासी वय ४१ वर्ष रा. खामला, मटन मार्केट रेवर कॅम्प, सोनेगाव, नागपूर हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतून खामला मटन मार्केट, नायरा पेट्रोल पंप जवळून मोबाईल पाहत जात असतांना, एक अनोळखी ईसम वय अंदाजे २० ते २२ वर्ष याने एका मोटर सायकलवर येवुन फिर्यादीचे हातातील नारझो कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे ८,०००/- रू. या जबरीने हिसकावुन पळुन गेला. अशा फिर्यादी यांनी दि. ०७१२.२०२४ रोजी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. १ ये अधिकारी व अंमलदार यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून त्यांनी सापळा रचुन आरोपी नामे आदित्य उर्फ येडी राजेन्द्र राहंगडाले वय २१ वर्ष रा. जयवंत नगर, अजनी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याचा साथिदार पाहिजे आरोपी क. २) आयुष गणविर रा. जयवंत नगर, नागपूर याचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक विचारपुस केली असता, त्यांनी वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत पुन्हा एक जबरी चोरीचा गुन्हा व पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वेग-वेगळया कंपनीचे मोबाईल फोन, एक स्प्लेंडर मोटर सायकल क. एम. एच ३१ डि.जे २७८८ असा एकुण किंमती अंदाजे ५५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीचा अभिलेख तपासला असता तो पोलीस ठाणे प्रतापनगर येथील ०२, जरीपटका येथील ०१. अंबाझरी येथील ०१ व अजनी येथील ०१ वाहन चोरीच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे समजले. आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई करीता प्रतापनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. सुहास चौधरी व त्यांचे पथकाने केली.