कन्हान :- पोलीस रायझिंग डे सप्ताह निमित्य कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्याना कन्हान पोलीस स्टेशन दाखवुन पोलीस स्टेशनच्या कामाविषयी, शस्त्रा विषयी माहिती तसेच पोलीसांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून रायझिंग डे साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.६) जानेवारी २०२५ ला पोलीस स्टेशन कन्हान येथे पोलीस रायझिंग डे सप्ताह निमित्त पो. स्टे. कन्हान हद्दीतील बिहारीलाल खंडेलवाल कॉम्प्रेसिव्ह स्कूल कन्हान या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कन्हान येथे बोलावुन विद्यार्थ्याना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली व पोलीस स्टेशन येथील शस्त्र दाखवुन त्यांना शस्त्र विषयी माहिती सांगण्यात आली.
तसेच पोलीस हा देशातील शहरी व ग्रामिण भागात शांती सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता मौलिक कार्याचा आधारस्तंभ आहे. त्याबाबत माहिती देण्यात आली.याप्रसंगी ठाणे दार कन्हान पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस नाईक आतिश मानवटकर, हे.कॉ.नरेश श्रावणकर, महिला पोलिस हवालदार नालंदा पाटील, वीणा थुल, बीकेसीपी शाळे तील शिक्षिका सौ अरुणा शर्मा, रेणु राऊत सह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.