मुंबई : महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज महिला व बालविकास विभागाच्या कामाची आढावा बैठक घेतली.
या बैठकीस प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त राहुल महिवाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाचे सदस्य सचिव उदय जाधव, राजमाता जिजाऊ मिशनचे संचालक संजीव जाधव उपस्थित होते.
यावेळी मंत्री लोढा यांनी विभागाचे विविध उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे आणि त्याचा लाभ राज्यातील अधिकाधिक महिला व बालकांना व्हावा, याबाबत सूचना केल्या.