स्वातंत्र्यदिन समारंभाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

Ø उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या ७७व्या वर्धापनदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त्‍ विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपायुक्त शशिकांत सावत, पोलीस उपायुक्त राहूल मदने, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी विविध विभागांनी समन्वायातून व चोख जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी केल्या. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ मिनिटांनी या कार्यक्रमाची रंगीत तालीम होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे राष्ट्रगाण व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण होणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रॅंगिंग समाजासाठी धोकादायक - न्या.व्ही.बी.कुलकर्णी

Thu Aug 8 , 2024
– रॅगिंग विषयावर जनजागृती शिबिर यवतमाळ :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पी. वाधवाणी कॅालेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने रॅंगिंग या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रॅगिंग समाजासाठी धोकादायक असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले जिल्हा न्यायाधीश- 1 व्ही.बी.कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com