महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई गावाच्या जमिनीवरील अतिक्रमणसंदर्भात पुढच्या आठवड्यात संबंधितांची बैठक घेणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई :- महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई, ता. तलासरी, जि. पालघर येथील गावातील स्थानिक प्रश्नांसोबतच मोजे वेवजी ता. तलासरी जि. पालघर व मोजे सोलसुंभा, ता. उंबरगाव, जि. बलसाड, गुजरात यांच्या सीमाहद्दीनिश्चिती कामासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले.

विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी विधानसभेत यासंदर्भातील उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री विखे पाटिल बोलत होते. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.

बोर्डी फाटा, बोरीगाव नारायण, ठाणे ते रा.मा ७३ रस्ता प्र.जि.मा.३ कि.मी. ०/०० ते १४/३०० या लांबीत सा.क्र.९/८६० ते १०/२९० अशी ४३.०० मी. लांबी ही गुजरात हद्दीमध्ये येत असून या रस्त्याच्या साखळी क्रमांकात सार्वजनिक बांधकाम विभाग, तलासरी यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येत नाही, परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता हा महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आहे व सार्वजिनक बांधकाम विभाग, तलासरी यांच्यामार्फत हद्द दर्शवणारे फलक वेळोवेळी स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्र गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्दनिशानी निश्चिती होण्यासाठी जिल्हाधिकारी, पालघर कार्यालयाने दि. ७ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी बलसाड, गुजरात यांना मौजे वेवजी, ता. तलसारी, जि. पालघर महाराष्ट्र राज्य व सोलसुंभा, ता. उंबरगाव, जि. बलसाड, गुजरात राज्य यांच्यातील सोमेची हद्द निशानी निश्चित करण्याच्या कामासंदर्भात संयुक्त मोजणी करण्यासाठी कळविले होते.

त्यानुसार, मौजे बेवजी ता. तलासरी, जि. पालघर व मोजे- सोलसुंभा, ता. उंबरगांव, जि. वलसाड येथील महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमे लगतचे सव्हें नंबर 203,204, 205, 206, 207, 279 व 280 चे स्थानिक उपसरपंच, स्थानिक नागरिक, ग्रामसेवक, तलाठी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांनी दाखविलेल्या कब्जे वहीवाटीप्रमाणे ई.टी.एस. मशिनच्या साह्याने उप अधीक्षक भूमी अभिलेख, तलासरी, जि. पालघर यांनी दिनांक 3.3.2022 ते दिनांक 4.3.2022 रोजी मोजणी काम केले आहे. मोजणीअंती गावनकाशा. गट बुक, पोटहिस्सा मोजणी आलेख व यापुर्वी झालेल्या मोजण्यांच्या आधारे उप अधीक्षक भूमी अभिलेख, तलासरी, जि. पालघर यांनी नकाशा तयार केला आहे.

मौजे वेवजी ता. तलासरी, जि. पालघर व मोजे- सोलसुंभा, ता. उंबरगांव, जि वलसाड येथील महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमेची हद्द निश्चित करणेकरीता उप अधिक्षक, भूमी अभिलेख, तलासरी, तलाठी व इत कर्मचारी दिनांक 26.5.2022 रोजी जागेवर गेले असता गुजरात राज्यातील उंबरगांव तालुक्याचे तहसिलदा तालुका विकास अधिकारी, उंबरगांव, सरपंच सोलसुंभा व गुजरात राज्यातील असंख्य स्थानिक नागरीक महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमा हद्द निश्चिती करण्यास तीव्र विरोध केला. याबाबत जिल्हाधिकारी, पालघर यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, वलसाड यांचेशी चर्चा करून हद्द निश्चितीच्या अनुषंगाने समन्वय साधण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत 50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Wed Jul 19 , 2023
मुंबई :- शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ही प्रक्रिया थांबवलेली नसून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!