विनालीलावीत सोनेगाव वाळू घाटावर महसूल प्रशासनाची धाड,2 ट्रक व 2 ट्रॅकटर जप्त

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 29:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या विनालीलावित सोनेगाव वाळू घाटावर तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने यशस्वीरित्या धाड घालून वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करून ट्रक मध्ये वाळु भरत असलेले 2 ट्रक व वाळू घाटाच्या कडेला वाळूने भरून उभे असलेले 2 ट्रॅक्टर जप्त करीत पुढील कार्यवाहीस्त्व जप्त वाहन मौदा पोलीस स्टेशन ला हलवित फिर्यादी नायब तहसिलदार राजेश माळी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी चार वाहनचालक वाहनमालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार कन्हान नदी पात्रावर असलेले विनालीलावीत सोनेगाव रेती घाटावर अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नायब तहसिलदार राजेश माळी व पथकाने आज सकाळी 10 वाजता यशस्वी धाड घातली असता सोनेगाव वाळू घाटावर दोन ट्रक अवैध वाळू उत्खनन करून वाळू वाहून नेत असलयाच्या बेतात दिसुन आले तसेच वाळू घाटाच्या कडेला असलेल्या रस्त्यावर दोन ट्रॅकटर वाळूने भरून दिसून आले यावेळी वाहनचालकांनी घटनास्थळहून वाहन सोडून पळ काढण्यात यश गाठले.या कार्यवाहितुन ट्रेकटर क्र एम एच 40 बी जी 1639, एम एच 40 सी ए 5746 व ट्रक क्र एम एच 36 एफ 397, एम एच 40 एन 6876 जप्त करून सदर चारही आरोपी ट्रक व ट्रेकटर चालक मालक विरुद्ध गुन्हा दाखल करीत सदर चारही ट्रक व ट्रेकटर मौदा पोलीस स्टेशन ला जप्त करण्यात आले.
ही यशस्वी कारवाही तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात परिक्षाविधीन तहसीलदार राजेश माळी, ,मंडळ अधिकारी संजय अनव्हाने, तलाठी नितीन उमरेडकर, तलाठी विनोद डोळस.तसेच मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस पथकाने मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कांग्रेस के वंशवाद "सर चढ़ के बोल रहा"

Wed Mar 30 , 2022
– खर्च कर नेता पुत्र/पुत्री बनते जा रहे पदाधिकारी तो दूसरी ओर आम कार्यकर्ता आज भी दरी उठाने को मजबूर है,फिर कैसे मुमकिन की पक्ष बढ़ेगी नागपुर – कुणाल नितिन राउत, शिवानी विजय वडेट्टीवार, विश्वजीत मारोती कोवासे, उन्मेश वसंत पुरके, लॉरेंस आनंदराव गेदम, केतन विकास ठाकरे, अनुराग सुरेश भोयर को ही देख लीजिए। सभी के पिता कांग्रेसी नेता हैं। इनमें […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!