संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा. सुनिता भौमिक या सेवानिवृत्त झाले.या निमित्त त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार झाला. पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण अध्यक्षस्थानी होते.या प्रसंगी मंचावर पोरवाल महाविद्यालयाचे उपप्रचार्या डॉ रेणू तिवारी, डॉ. मनीष चक्रवर्ती, पर्यवेक्षक प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल व सत्कारमूर्ती प्रा. सुनिता भौमिक उपस्थित होत्या.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल,प्रा. डॉ. पाल,प्रा. डॉ.ढोले लता बोरकर यांनी प्रा. सुनिता भौमिक यांच्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा घेत निवृत्ती नंतर त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत त्यांना शुभेच्छा दिल्या.सत्काराला उत्तर देताना प्रा सुनिता भौमिक यांनी सर्वांचे आभार मानले.महाविद्यालयात दिर्घ काळ शैक्षणीक कार्य करताना अनेकांचे सहकार्य लाभले,अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ मोठया हुद्द्यावर कार्यरत आहेत.गुरू म्हणून मोठा आदर मिळतो.हीच खरी संपत्ती सेवेत कमावली आहे ,असे भावोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमांचे संचालन प्रा. डॉ. निता वानखेडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. असरार यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ज्ञानेश्र्वर रेवतकर यांनी केले.