निवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

– नाशिक, रायगड, जिल्ह्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्तेही भाजपामध्ये

मुंबई :- नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.

डॉ. दिघावकर यांच्या बरोबर नाशिक जिल्हयातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील डॉ. दिघावकर यांच्या प्रशासनातील अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जाईल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष आणि सरकार पातळीवरून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पार्टी च्या वाढीसाठी आपण समर्थपणे योगदान देऊ तसंच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे डॉ . दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

डॉ. दिघावकर यांच्यासमवेत बळीराजा आत्मसन्मान संघटनेचे भाऊसाहेब आहिरे, सटाणा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब भदाणे, नामपूर बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे, चारुशीला बोरसे , विक्रम मोरे, भाऊसाहेब कापडणीस, कृषीभूषण खंडू अण्णा शेवाळे, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चारचाकी - दुचाकीमध्ये धडक, एकाचा मृत्यु तर एक जखमी

Thu Aug 3 , 2023
रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक- तुमसर महामार्गावरील बोरी-शिरपूर शिवारात २ ऑगस्ट २०२३, बुधवारच्या सकाळी ११.०० वाजता रामटेक कडुन तुमसर कडे जाणाऱ्या टाटा-सुमो क्रमांक एम.एच.२९ व्ही ९८८४ आणि तुमसर कडुन रामटेक कडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.४० बी.एन.४८८७ मध्ये आमोरासमोर धडक झाली. घटनेत दुचाकीवरील एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल चालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com