लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई :- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, राज पुरोहित, कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की , अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपा ची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.

यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली पाहिजेत. ३ कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि शिवसेना युतीसह लोकसभेच्या सर्व ४८ जागा, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या राम नाईक, मुकुंदराव कुलकर्णी, मधू चव्हाण, कांता नलावडे, दिलीप गोडांबे, कर्नल चौधरी, कर्नल देशपांडे, अनंत मराठे, शैला पतंगे – सामंत, दिलीप हजारे, भरत कारंडे, श्रीपाद मुसळे, बाबा कुलकर्णी आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याआधी बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या आयुष्मान भारत सेल तर्फे आयोजित आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचा प्रारंभही बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढी येथे तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव ला 5 एप्रिल पासून सुरुवात

Thu Apr 6 , 2023
कोदामेंढी :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा निमित्त येथील श्रीराम भक्त हनुमान जन्मोत्सव समीती तर्फे वार्ड क्रमांक 2 स्थित मंदिर मस्जिद चौक स्थित हनुमान मंदिरात तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव 5 एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे. 5 एप्रिल ला दुपारी 4.00 वाजता घटस्थापना करण्यात आली.6 एप्रिल ला सकाळी 6.00 वाजता हनुमान जन्मकथा,7.00 वाजता हनुमान चालीसा पठन,8.00 वाजता प्रभात फेरी (दिंडी )9.00 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!