बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी केले अर्धनग्न व मुंडण आंदोलन 

– आज बेमुदत आमरण उपोषणाच्या १० वा दिवस.

पुणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे (बार्टी) कार्यालयासमोर स्वातंत्र्यच्या 77 व्या पूर्व संधेला आज मुंडन व अर्धनग्न आंदोलन करण्यात आले असून ५ ऑगस्ट २०२२ पासून आमरण उपोषणास बसणाऱ्या हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड यांचा आज आमरण उपोषणाचा दहावा दिवस हौता.

काल उपोषणकर्त्यांची सामाजिक न्याय व सहाय्यक विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून संशोधक विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२३ चा सर्वंकष समान धोरणाचा निर्णय व २५ जुलै २०२४ रोजी शासनाने बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय असंवैधानिक आहे हे पटवून दिले आहे.

उपोषणकर्ते यांनी प्रधान सचिवासमोर आपली भूमिका ठामपणे मांडली असून अधिछात्रवृत्ती ५० टक्के दराने अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थी घेणार नसल्याची सांगितले आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी सुद्धा आज २०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आंदोलनाला उपस्थिती होती.

शासन अनुसूचित जाती व जमातीचे शैक्षणिक संवैधानिक अधिकार ३० ऑक्टोबर २०२२ च्या निर्णयातून नाकारत आहे, ही राज्य सरकारची जातीवादी भूमिका असून बार्टी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण हे अधिछात्रवृत्ती साठीच नसून एस. सी. व एस. टी. विद्यार्थ्यांच्या संवैधानिक, शैक्षणिक अधिकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि बचावात्मक आहे. सारथी व महाज्योती यांचे निकष बार्टी आणि टी. आर. टी. यावर शासनाने लादू नये, अन्यथा हे धोरण जातीवादी व असंवैधानिक ठरेल असे संशोधक विद्यार्थी यांनी मत व्यक्त केले आहे.

आज बार्टी कार्यालयासमोर झालेल्या अर्धनग्न व मुंडन आंदोलनामध्ये संशोधन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. मुंडन आंदोलनामध्ये मारुती सोनकांबळे व प्रदीप मैदकर व इतर विद्यार्थ्यांनी मुंडन केले असून संशोधक विद्यार्थ्यांनी अर्धनग्न होऊन मोठ्या प्रमाणात ५० टक्के अधिछात्रवृत्तीचा विरोध केला असून, १०० टक्के अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून देण्याची मागणी केली आहे. उद्या 77 व स्वातंत्र्य दिन असून पुण्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आहेत. पुण्यात असलेल्या उपोषणामुळे स्वातंत्र्य दिनाला काळीमा फासू नये यासाठी अर्थमंत्री असलेल्या पवारांनी स्वतः पुढाकार घ्यावा.

यावेळेस बार्टी कार्यालयातील परिसर संशोधक विद्यार्थ्यांच्या नाऱ्यांनी गुंजत होता. दहाव्या दिवशीही उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत २०२२ च्या विद्यार्थ्यांना यूजीसीने निर्धारित केल्याप्रमाणे १०० टक्के अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली, अशी माहिती स्वतः आंदोलनात असलेले संशोधक उत्तम शेवडे ह्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

78th INDEPENDENCE DAY CELEBRATED AT DPS MIHAN

Fri Aug 16 , 2024
Nagpur :-The 78th Independence Day celebrations at DPS MIHAN showcased a tribute to our spirit of Unity and National Pride. The programme began with the hoisting of the tricolour by the Chief Guest Dr. Hemant Bherwani, Senior Scientist, CSIR-NEERI, and the Principal Nidhi Yadav in the presence of the staff and the students. The President and Pro Vice Chairperson of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!