संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वातंत्र्याचा 76 वर्षाचा सुवर्णकाळ लोटला मात्र आजही कामठी तालुक्यात सामाजिक न्याय विभागाचे कुठल्याही प्रकारचे कार्यालय कार्यरत नाही त्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांना कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास नागपूरचे जिल्हास्तरीय समाज कल्याण कार्यालय गाठावे लागते त्यामुळे कामठी तालुका स्तरावर कामठी तालुक्यात समाजकल्याण कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे.
मागील काही वर्षांपासून बार्टीच्या माध्यमातून अनुभवी समतादूत मनुष्यबळ समाजकल्याण विभागाच्या योजना गाव व तालुकास्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे काम करीत आहे परंतु समतादूत यांना लाभार्थ्याना प्रत्यक्ष लाभ देण्याचे अधिकार नाहीत .समतादूत यांचे समाजकल्याण विभागात समायोजन करून समजकल्यान विभागाचे कार्यालय कामठीत सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.