अवकाळी पावसाने झालेली गहु व इतर पिकाची नुकसान भरपाईस आर्थिक सहायता करा

 – तहसिलदार व कृषी अधिका-याना शेतक-यांनी निवेदन देऊन केली मागणी. 

कन्हान :- परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु व इतर पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने शेत पिकाची मौका चौकसी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासना कडे पाठवुन नुकसान ग्रस्त शेतक-याना आर्थिक साहयता मिळवुन द्यावी. अ़शी मागणी बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे यांच्या नेतुत्वात शेतक-यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्या आली आहे. 

ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) परिसरातील शेत शिवारात पंधरा दिवसा अगोदर अवकाळी पाऊस झाल्यामुळे हंगामी गव्हु व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱी पुन्हा आर्थिक संकटात सापडुन चिंतातुर झालेला आहे. करिता आपण बोरडा (गणेशी) परिसरातील शेतातील शेत पिकाची मौका चौकशी करून योग्य अहवाल शासनाकडे पाठ वुन शेतक-याना नुकसान भरपाई म्हणुन शासनाचे आर्थिक साहय मिळवुन देण्यास सहकार्य करावे.

अशी मागणी मंगळवार (दि.२७) ला ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) उपसरपंच नरेंद्र ठाकरे हयांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने तहसिलदार पारशिवनी व तालुका कृषी अधिकारी प स पारशिवनी हयाना निवेदन देऊन केली आहे. शिष्टमंडळात ग्रा प बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, दिनेश बंड, मंगेश अमृते, निरंजन बालकोटे, संजय मानवटकर, चंद्रशेखर डडूरे, राहुल नान्हुरे, अमित राऊत, धनराज गडे, मुकेश सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन गावातील शेतकरी सुधाकर कुहिटे, कांतीलाल परसुडे, राहुल बालकोटे, श्रावण सोनवणे, रवींद बालकोटे, सुदाम डडुरे, ब्रम्हा डडुरे, परमेश्वर हारोडे, अनिल वाघमारे, श्रावण सोनवणे, हर्षल संतापे सह गावकरी शेतक-यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

Thu Feb 29 , 2024
Ø महिलांची उपस्थिती लक्षणीय यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com