महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीकरता लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली :- समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ – २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे. महाविद्यालयांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करून घ्यावी. महाडिबीटी प्रणालीवर मार्गदर्शक तत्वे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे नियम यासाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.  https://mahadbtmahait.gov.in/Home/Index सदर योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागू राहील. दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी सुरु झाली असुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन

Tue Oct 15 , 2024
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई द्वारे उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ व ०१ डिसेंबर, २०२४ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडपात्र प्रकरणे विशेष लोकअदालतीमार्फत निकाली काढण्याकरीता विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ यांनी विशेष लोकअदालतीमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com