राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

नागपूर : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी, यासाठी संबंधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्मृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.

महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत, यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरण योग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिध्दीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मिती संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिध्दी होईल.

अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharastra.gov या संकेतस्थळावर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिभावंतच माध्यमांची उंची वाढवतात पत्रकार दिनाला आयोजित ‘गोलमेज’ चर्चेतील सूर 

Sat Jan 7 , 2023
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी अभिवादन नागपूर : प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स असो की डिजीटल पत्रकारितेत प्रत्येक माध्यमांचे आपले महत्व आहे. या माध्यमांचा वापर करणारे व्यक्तिमत्व किती अभ्यासू, समाजाभिमुख, सामाजिक जाणिवा ठेवणारे आहे, यावर त्या माध्यमांची उंची वाढत जाते, असा सूर पत्रकार दिनाला आयोजित ‘गोलमेज’ चर्चेत व्यक्त झाला. नागपूर जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!