नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत प्लॉट न. ४/५ वाठोडा, पश्चिम रोड, इंदिरादेवी टाउन येथे राहणार्या फिर्यादी चंद्रकला मधुकर खेळे वय २४ वर्ष यांनी त्यांची पांढया रंगाची ईंटींगा गाडी क्र. एम.एच ४९ यू. ७७६८ किमती अंदाजे ९,००,०००/- रूबी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी करून घेवुन गेला. फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे नंदनवन येथे कलम ३७९, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता…
सदर गुन्हयांचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमुन तसेच आरोपीचा तांत्रीक माध्यमातून तपास करून आरोपी १) विजय उर्फ काल्या कंसाराम निर्मलकर वय ३३ वर्ष रा. एन.आय.टी ७०, क्वार्टर चिखली, कळमणा २) पुनित संतोष निर्मलकर वय ३२ रा. कापसी, भंडारा रोड पोलीस ठाणे वाठोडा यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने वरील गुन्हा त्यांचे साथिदारांसह केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना नमुद गुन्हयात अटक केली. आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी पोलीस ठाणे मौदा ही पेंशन मोटरसायकल क्र. एम. एच. ४०.बी.ए. ५८४१ किमती अंदाजे ५०,०००/- रु चोरी केल्याची तसेच पोलीस ठाणे पारशिवनी हद्दीतून हिरो स्प्लेंडर प्लस गाडी क्र. एम.एच.४०.सि.ई. ३४७२ किमत अंदाजे ४५,०००/- रु.ची चोरी केल्याची व पोलीस ठाणे पारडी हदीतुन वाहन चोरीची कबुली दिली. आरोपी कडुन एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचे ताब्यातून एकूण किमती १०,६०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे पाहिले साथिदार आरोपी नरेश महिलांगे व दिपक बघेल रा. विजय नगर, नागपूर यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय पाटील (गुन्हे शाखा), पोलीस सुदर्शन मक्का, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), संजय जाधव, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पोनि शुभांगी देशमुख, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा बबन रावत, नापोज सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, सोनू भावरे, मनोज टेकाम, सुनित गुजर, शरद चांभारे, योगेश सेलुकर, नितीन बोपुलकर व चंद्रशेखर भारती यांनी केली.