मुंबई :- रिपब्लिकन विचारधारा हे फक्त राजकारणाचे माहेरघर नाही जो येईल आणि राजकारण करेल रिपब्लिकन अस्तित्वात बुद्ध तत्त्वज्ञान आणि भारतीय संविधानाच्या गाभा आहे या करिता रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवणें हे प्रत्येक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ते आणि समाजाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते मुंबई येथील रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मारक येथे आयोजित रिपब्लिकन अस्तित्व परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेचे उद्घाटन नामदेवराव निकोसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध शकुन उत्तर प्रदेश, रमा अहिरे, कैलास भालेराव, छाया शेळके, लता भालेराव, सुप्रसिद्ध गायिका कल्पना सुर्यवंशी, जयश्री मसराम, सुधाकर टवले हे होते. प्रथम वैशाली सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर डॉ. आम्रपाली चौरे यांनी दिपप्रज्वलन केले प्रास्ताविक प्रा.रवी गमरे यांनी केले.
या प्रसंगी मिरा सपकाळ, रमा अहिरे, यांनी रिपब्लिकन अस्तित्व यांची जान करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश कांबळे यांनी मानले. याप्रसंगी शहिद भीम सैनिक स्मारक समितीचे माजी अध्यक्ष नामदेवराव उभाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यस्वस्वीसाठी अशोक हिरे, काकासाहेब गांगुर्डे, मंगेश पगारे, यांनी परिश्रम घेतले.