-ठिकठिकाणी असणार नाकाबंदी सुरक्षेच्या दृष्टीने नाक्या नाक्यावर पोलीस तैनात असणार – प्रजासत्ताक दिनी
लसीकरण झाल्याचे दोन प्रमाणपत्र असल्यावरच मिळणार रामटेक येथे प्रवेश. ...
रामटेक :-प्रत्येकजण प्रजासत्ताक दिनाची आतुरतेने वाट पाहत असतोच. अनेक नागरिक विशेषतः तरुणांचा जल्लोष काही वेगळाच असतो….
दरवर्षी जागो जागी मोठमोठ्या डीजे च्या आवाजात गाणी वाजवून ,प्रभात फेरी काढून फटाके फोडून ,प्रजासत्ताक दिंन साजरा करतात…..
अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. या वर्षी मात्र संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले आहे…. २६ जानेवारी ला दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरीच प्रजासत्ताक दिनसाजरा करावा. प्रजासत्ताक दिनी बहुसंख्येने नागरिक धार्मिक स्थळे, व पर्यटन स्थळांवर जात असतात. सुरक्षेच्या दृष्टीने नाक्या नाक्यावर पोलीस तैनात असणार आहे… रामटेक येथे प्रवेश करताना तसेच जिथे झेंडा वंदन होईल तिथे
लसीकरण झाल्याचे दोन प्रमाणपत्र असल्यावरच प्रवेश मिळणार आहे….
एकाच ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात ,असे प्रशासनाचे निर्देश आहेत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन रामटेक पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्र्वर यांनी नागरीकांना केले आहे…