संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वंचित बहुजन आघाडी बिडगाव शाखेच्या वतीने बिडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कामठी यांना बिडगाव येथे स्मशान भुमीसाठी जागा मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी नागपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी पूर्व महासचिव प्रशांत नगरकर, जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, तालुका संघटक राजेश ढोके, रिता जामगडे, शालू सहारे, जितसिग जूनी, दिपक वासनिक,सी.सी.वासे, प्रमोद दादा कांबळे, अजय मेश्राम,सुरज वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.