अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखांपेक्षा निधी वितरणास मान्यता – मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

मुंबई :- राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.

या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मदत, पुनर्वसन मंत्री पाटील यांनी सांगितले, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. यापूर्वी दि.१० जानेवारी २०२४ व दि.३१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रु.१४४.१० कोटी व रु. २१ हजार ०९.१२ कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दि.२ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी, २०२४ ते मे, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रु.५९६.२१ कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फुटाळा तलाव संरक्षण समितीने १०१ किलो वजनाची पर्यावरणपूरक तुरटीची गणेश मूर्ती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना दिली सप्रेम भेट

Sat Sep 7 , 2024
नागपूर :-दि.६/९/२४ रोजी दुपारी ३.०० वा नागपूर शहराचे  पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना फुटाळा तलाव संरक्षण समितीने १०१ किलो वजनाची पर्यावरणपूरक तुरटीची गणेश मूर्ती सप्रेम भेट म्हणून दिली. या मागचा उद्देश हा आहे की,पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण संदेश नागपूरकरांना देणे होय. पोलीस आयुक्त यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून नंतर विसर्जनाचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी मांडला. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com