नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – संजय राठोड

* दिग्रस येथे बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप

* तालुक्यातील २५०० नोंदणीकृत कामगारांना लाभ

यवतमाळ :- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्यावतीने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पालकमंत्री राठोड यांच्याहस्ते दिग्रस तालुक्यातील २ हजार ५०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, पराग पिंगळे, राजकुमार वानखडे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, मिलिंद मानकर, रमाकांत काळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये पुर्वी कामगारांना पेटीचे वाटप करण्यात येत होते. या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने गृहोपयोगी साहित्य वाटपाची योजना सुरु करण्यात आली. या साहित्याच्या संचात १७ प्रकारच्या ३० साहित्याचा समावेश आहे. या वस्तू उत्तम दर्जाच्या व उपयुक्त अशा आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अनेक कामगारांनी नोंदणी केली परंतू नंतर नोंदणीचे नुतनीकरण केले नसल्याने त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अनेक कामगारांची नोंदणी देखील झाली नाही. नुतनीकरण व नवीन नोंदणीची विशेष सुविधा दिग्रस येथे उपलब्ध करुन देणार आहोत. कामगारांना आता आँनलाईन पद्धतीने थेट लाभ दिला जातो. त्यामुळे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध रहावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. पराग पिंगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Sat Feb 24 , 2024
यवतमाळ :- नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे येत्या 1 मार्चला यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com