संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-1 जुलै रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन कामठी चे तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर यावर्षीच्या दुसऱ्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.1 जुलै रोजी 18 वर्षे पूर्ण केलेले नवमतदाराची मतदार नोंदणी करणे,विधानसभा निवडणूक आधी अद्यावत मतदार यादी तयार करणे याकरिता 25 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 25 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल. सदर यादी वेबसाईट वर उपलब्ध असणार आहे.तसेच संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऐप चा वापर करुन मतदारांना आपले नाव व पत्ता हे तपशिल पाहता येईल.25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांना त्यांचे नाव, पत्ते आणि अन्य तपशील दुरुस्त्या करण्यासाठी मतदार यादीत आपले नावासोबत मोबाईल क्रमांक जोडणे,दिव्यांगत्व चिन्हांकित करणे,योग्य कारणासाठी मतदार ओळखपत्र पुन्हा मिळविणे, आधार कार्ड जोडणे, मृत्यू व कायमचे स्थलांतर या कामाकरिता अर्ज भरता येईल.नवीन नाव नोंदविण्यासाठी अर्ज क्र 6,मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती बदल,दिव्यागतव चिन्हांकित करणे,ओळखपत्र पुन्हाहून मिळविणे,याकरिता अर्ज क्र 8,मतदार यादीतून नाव वगळणे,याकरिता अर्ज क्र 7 भरता येईल.प्रत्येक अर्जासोबत गरजेनुसार आपले छायाचित्र,पत्ता तसेच वयाच्या पुराव्याचा दस्तावेज वा इतर दस्तावेज च्या स्वाक्षरी कृत प्रत जोडणे अनिवार्य असणार आहे.या कार्यक्रमाच्या कालावधीत प्राप्त अर्ज, दावे हरकती 19 ऑगस्ट पर्यंत निकाली काढले जातील व त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.